Blog

Suraj FIDE Rating Open Chess Tournament , Sangli 2019 कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीयमास्टर सम्मेद शेटे विजेता

 • Chess
 • 29 Dec, 2019
 • Views (515)
 • Administrator

नूतन बुध्दिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् ॲकॅडमी , कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित " सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीयमास्टर सम्मेद शेटे व ओरिसाचा बिस्वजित नायक यांच्यातील डावात सम्मेदने रचलेल्या चालीना बिस्वजितने काही प्रमाणात प्रत्युत्तर देऊन डावावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. अखेर 60 व्या चालीला सम्मेदने बिस्वजितचा पराभव करून रू.35000/- च्या रोख पारितोषिकासह कै.अनंत गणेश पंडित सराफ फिरती रौप्यढाल पटकाविली. तर बिस्वजितला 6.5 गुणासह सहाव्या स्थानावर जावे लागले. सातारचा ओंकार कडव व कोल्हापूरचा आदित्य सावळकर यांच्यातील डावात आदित्यने ओंकारचा 76 व्या चालीला पराभव करून आदित्यने 7 गुणासह रू 25000/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. तर ओंकारला 6 गुणासह 1600 ते 1899 मध्ये तिस-या स्थानावर जावे लागले. पुण्याचा सिध्दांत गायकवाड व रेंदाळचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात सिध्दांतने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या श्रीराजचा 30 व्या चालीला पराभव करून सिध्दांतने 7 गुणासह रू.15000/- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले तर श्रीराजला 6 गुणासह रू. 3500/- च्या रोख पारितोषिकासह सातव्या स्थानावर जावे लागले. पुण्याचा प्रथमेश धर्माधिकारी व अहमदनगरचा संकर्ष शेळके यांच्यातील डावात प्रथमेशने रचलेल्या चालीना अनुभवी संकर्षने 37 व्या चालीला प्रथमेशचा पराभव करून 6.5 गुणासह संकर्षने 6.5 गुणासह रू. 10000/- च्या रोख पारितोषिकासह चौथ्या स्थान पटकाविले तर प्रथमेशला 5.5 गुणासह पंधराव्या स्थानावर जावे लागले.

मुंबईचा संजीव मिश्रा व मुंबई श्रेयस पाटील यांच्यातील डावात संजीवने श्रेयसचा 67 व्या चालीला पराभव करून संजीवने 6.5 गुणासह रू. 7500/- च्या रोख पारितोषिकासह पाचवे पाचवे स्थान पटकाविले.
मुंबईचा हिमांशू छाब्रा व पुण्याचा हर्षल पाटील यांच्यातील डावाची सुरूवात राणीच्या प्यादयाने झाली. हिमांशूने रचलेल्या चालीना हर्षलने जशास तसे प्रत्युत्तर देऊन डावावर समान वर्चस्व राखले व 50 व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला. हिमांशूने 6 गुणासह दहावे स्थान पटकाविले. इचलकरंजीचा रविंद्र निकम व सांगलीचा शुभम मालाणी यांच्यातील डावात रविंद्रने रचलेल्या चालीना शुभमने प्रत्युत्तर देऊन रविंद्रचा 73 व्या चालीला पराभव करून शुभमने 6.5 गुणासह रू. 5000/- च्या रोख पारितोषिकासह 1300-1599 मानांकित खेळाडूत प्रथम स्थान मिळवले. सांगलीचा रोहित मोकाशी व मिरजेचा अभिषेक पाटील यांच्यातील डावात रोहितने अभिषेकचा 42 व्या चालीला पराभव करून 6.5 गुणासह रोहितने 1600 ते 1899 मानांकितात प्रथम स्थान पटकाविले.तर अभिषेकला 5.5 गुणासह तेराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सोलापूर विरेश शरणार्थी व पुण्याचा साहील शेजल यांच्यातील डावात दोघांनी समान चाली रचून 76 व्या चालीला डाव बरोबरीत सोडविला अर्ध्या गुणासह साहीलने 6 गुणासह नववे स्थान पटकाविले. सांगलीचा संदीप माने व मिरजेचा मुदस्सर पटेल यांच्यातील डावात संदीपने रचलेल्या चालीना मदस्सरने प्रत्युत्तर दिले व 79 संदीपचा पराभव करून मुदस्सरने 6 गुणासह आठवे स्थान पटकाविले.

आठव्या फेरीअखेर गुण व विजेते -
1) सम्मेद शेटे ( कोल्हापूर )-8
2) आदित्य सावळकर ( कोल्हापूर ) - 7
3) सिध्दांत गायकवाड ( पुणे )-7
4) संकर्ष शेळके ( अहमदनगर ) -6.5
5) संजीव मिश्रा ( मुंबई )-6.5
6) बिस्वजित नायक ( ओरिसा )- 6.5
7) श्रीराज भोसले ( रेंदाळ ) -6
8) मुदस्सर पटेल ( मिरज )-6
9) साहील शेजल ( पुणे )-6
10) हिमांशू छाब्रा ( मुंबई )-6
11) उमेश दांडे कर ( पुणे )-6
12) रविंद्र निकम ( इचलकरंजी )-5.5
13) अभिषेक पाटील ( मिरज)-5.5
14) प्रथमेश धर्माधिकारी ( पुणे )-5.5
15) भूषण पवार ( महाराष्ट्र )-5.5
16) राकेश कुलकर्णी ( मुंबई)-5.5
17) सौरभ परमार ( महाराष्ट्र )-5.5
18) केशव आरगाडे ( पुणे )-5.5
19) प्रशांत पिसे ( पुणे)-5.5
20) ओंकार पाटील ( पुणे ) -5.5
21) वैभव कुलकर्णी ( पुणे )-5.5
22) नझीर काझी ( सातारा)-5.5
उत्कृष्ठ 1600 ते 1800 -1) रोहित मोकाशी 2) ओम लामकाणे 3) ओंकार कडव
उत्कृष्ठ 1300 ते 1599 -1) शुभम मालाणी 2) हर्षल पाटील 3) प्रविण सावर्डेकर 4) शौर्या लक्ष्यजीत
उत्कृष्ठ1000 ते 1299-1) विरेश शरणार्थी 2) श्रीओम रेवणकर 3) श्रेयस पाटील 4) अभिषेक चव्हाण
उत्कृष्ठ बिगरमानांकित -1) साहील इनामदार 2)विरेंद्र जहागिरदार 3)चिन्मय ढेरे 4)अखिलेश खरात
उत्कृष्ठ महिला खेळाडू -1)जिया महात 2) दिव्या पाटील 3) मयुरी सावळकर
उत्कृष्ठ ज्येष्ठ खेळाडू -1) राजीव कोल्हटकर 2) शालिनी पाटील
उत्कृष्ठ 15 वर्षाखालील खेळाडू -1) प्रथमेश दिवेकर 2) पार्थ वालेकर 3)वरूण जहागिनी
उत्कृष्ठ 13 वर्षाखालील खेळाडू -1) प्रथमेश काशिद 2) ऋषभ जठार 3) आयुष वाघ
उत्कृष्ठ 11 वर्षाखालील खेळाडू -1) ईश्वरी जगदाळे 2) कणिश जैस्वाल 3) गुरूप्रसाद कुलकर्णी
उत्कृष्ठ 9 वर्षाखालील खेळाडू -1) मानस गायकवाड 2) श्रीया हिप्परगी 3) शौर्या खाडीलकर
उत्कृष्ठ 7 वर्षाखालील खेळाडू -1) आरूष डोळस 2) शाश्वत गुप्ता 3) अभय भोसले
उत्कृष्ठ सांगली खेळाडू -1) संदीप माने 2) निहाल महात 3) अभिजीत कांबळे

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कलापी इंजि.इंडस्ट्रीजचे मा. योगेश लोहकरे यांच्याहस्ते मा.एन.जी. कामत , डॅा. उल्हास माळी प्रा. रमेश चराटे, विनायक जोशी ,चिंतामणी लिमये, श्री. चिदंबर कोटीभास्कर , कुमार माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच श्री. विवेक सोहनी, फिडे पंच श्री. दिपक वायचळ,शार्दुल तपासे, आनंदिता प्रदीप, श्री. सूर्याजी भोसले, मोहिनीराज डांगे यांनी काम पाहिले.

Share

Leave a Comment

Be the first comment!

Puzzle

 Queen for Queen & Knight

Queen for Queen & Knight

 • Chess
 • 06 May, 2020
 • Views (937)
 • Administrator
Read More

Popular Blogs

Late Bhausaheb Padsalgikar Winners List 7th SEP 2020

Late Bhausaheb Padsalgikar Winners List 7th SEP 2020

 • Chess
 • 09 Sep, 2020
 • Views (2126)
 • Administrator
Read More
Simultaneous Chess - कोल्हापूरात रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनिश गांधी एकाच वेळी पन्नासहून अधिक बुद्धिबळपटूशी लढत देणार

Simultaneous Chess - कोल्हापूरात रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनिश गांधी एकाच वेळी पन्नासहून अधिक बुद्धिबळपटूशी लढत देणार

 • Chess
 • 31 May, 2019
 • Views (1446)
 • Administrator
Read More

Tournaments

Masthanaiah Chess World 1978 Presents

Masthanaiah Chess World 1978 Presents

 • Chess
 • 27 Oct, 2020
 • Views (2624)
 • Administrator
Read More
PUROHIT CHESS ARENA TOURNAMENT

PUROHIT CHESS ARENA TOURNAMENT

 • Chess
 • 21 Oct, 2020
 • Views (1780)
 • Administrator
Read More