नूतन बुध्दिबळ मंडळाच्या ५२ व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील कै. आबासाहेब गानू स्मृती १२ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत सोलापूरचा श्लोक शरणार्थी व सोलापूरचा विरेश शरणार्थी यांच्यातील डावात दोघांनी डाव बरोबरीत सोडविला. ६.५ गुणासह श्लोकने रू.४००० /- च्या रोख पारितोषिकासह कै. डॅा. देबसिकदार फिरती रौप्यढाल पटकाविली तर विरेशला ५.५ गुणासह सहाव्या स्थानावर जावे लागले. कोल्हापूरचा झिशान फरास व कोल्हापूरची हर्षिता काटे यांच्यातील डावात हर्षिताने झिशानचा पराभव करून ६ गुणासह रू. ३००० /- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. कोल्हापूरची दिव्या पाटील व पुण्याची दाक्षयांनी चव्हाण यांच्यातील डावात दोघांनी ३५ व्या चालीला दोघांनी डाव बरोबरीत सोडविला. ५.५ गुणासह दिव्याने रू.२००० /- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले तर दाक्षयानीने ५.५ गुणासह पाचवे स्थान पटकाविले.
सातव्या फेरीअखेर गुण व विजेते
१) श्लोक शरणार्थी ( सोलापूर)- ६.५
२) हर्षिता काटे ( कोल्हापूर)- ६
३) दिव्या पाटील ( कोल्हापूर)- ५.५
४) सन्मित शहा ( सातारा )- ५.५
५) दाक्षयानी चव्हाण ( मुंबई)- ५.५
६) विरेश शरणार्थी ( सोलापूर)- ५.५
७) हदीन महात ( सांगली)- ५
८) प्रथमेश देशमुख ( लातूर)- ५
९) यश भागवत ( कोल्हापूर)- ५
१०) सई घाटगे ( पुणे )- ४.५
११) ईश्वरी जगदाळे ( सांगली)- ४.५
१२) स्वराली हातवळणे ( सोलापूर )- ४.५
१३) फरास झिशान ( कोल्हापूर)- ४.५
१४) निल मंत्री ( कोल्हापूर)- ४.५
कै. काकासाहेब टिकेकर स्मृती २५ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत कोल्हापूरचा अनिश गांधी व कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला. ५.५ गुणासह अनिशने रू.४०००/- च्या रोख पारितोषिकासह कै. रामभाऊ भिडे देशमुख फिरता रौप्य करंडक पटकाविला तर श्रीराजने ४.५ गुणासह रू. २५०० /- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. सातारचा अनिकेत बापट व सोलापूरचा सोहेल तांबोळी यांच्यातील डावात सोहेलने अनिकेतचा पराभव करून ४.५ गुणासह रू. १२०० /- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले. तर अनिकेतला ४ गुणासह सातव्या स्थानावर जावे लागले. मिरजेचा अभिषेक पाटील व कोल्हापूरचा प्रणव पाटील यांच्यातील डावात अभिषेकने प्रणवचा पराभव करून रू. ५०० /- च्या रोख पारितोषिकासह चौथे स्थान पटकाविले.
सहाव्या फेरीअखेर गुण व विजेते -
१) अनिश गांधी ( कोल्हापूर)- ५.५
२) श्रीराज भोसले ( कोल्हापूर)- ४.५
३) सोहेल तांबोळी ( सोलापूर)- ४.५
४) अभिषेक पाटील ( सांगली)- ४.५
५) शुभम मालाणी ( सांगली)- ४
६) कौस्तुभ गोटे ( कोल्हापूर)- ४
७) अनिकेत बापट ( सातारा)- ४
चितळे डेअरी सिनिअर्स बुध्दिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत इचलकरंजीचा राहूल सामानगडकर व ठाणेचा गोपाळ राठोड यांच्यातील डावात ४ गुणासह आघाडीवर असलेल्या गोपाळने बरोबरीचा प्रस्ताव मांडून ४.५ गुणासह रू.४०००/- च्या रोख पारितोषिकासह चितळे टॅाफी पटकाविली तर राहूलला ४ गुणासह रू.१६०० /- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले. इचलकरंजीचा रविंद्र निकम व कोल्हापूरचे माधव देवस्थळी यांच्यातील डावात रविंद्रने माधवचा पराभव करून रू.२५०० /- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. कर्नाटकचा सदानंद बाचलकर व सांगलीचे आनंद वाटवे यांच्यातील डावात सदानंद बाचलकरांनी आनंदचा पराभव करून ४ गुणासह रू.१३०० /- च्या रोख पारितोषिकासह चौथे स्थान पटकाविले.
पाचव्या फेरीअखेर गुण व विजेते -
१) गोपाळ राठोड ( सोलापूर ) - ४.५
२) रविद्र निकम ( इचलकरंजी) - ४.५
३) राहूल सामानगडकर ( इचलकरंजी) - ४
४) सदानंद बाचलकर ( बेनाडी ) - ४
५) विलास मोघे ( सांगली) - ४
५० वर्षावरील -
१) माधव देवस्थळी
२) राजू सोनेचा
३) आनंद वाटवे
६० वर्षावरील -
१) शिरीष गोगटे
२) सदाशिव कदम
३) नाईक बी.एस.